नागपुर- विकास बनसोड़ जिल्हा प्रतिनिधि
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही आदिवासींच्या जीवनात फारसा फरक पडलेला नाही.मेळघाटात अजुनही फारमोठ्या प्रमाणात कुपोषण आहे.आदिवासींच्या हाताला काम नाही.मेळघाटात अजुनही महिला प्रधान संस्कृती आहे.तिथे महिला कामाला जातात आणि पुरुष घर सांभाळतात.त्यामुळे "महिलांना काम व पुरुषांना आराम"असे चित्र बघायला मिळते.आदिवासींच्या उत्थानासाठी ,कुपोषण मुक्तीसाठी लक्षावधी रुपये शासनाचे खर्च होत आहे.अनेक एनजिओ कागदोपत्री काम करताना दिसतात.पण प्रत्यक्षात मात्र जैसेथे वैसेच अशी परिस्थिति आहे.माझ्या राजकिय जीवनाची सुरुवातच मेळघाट मधुन झाली.त्यामुळे मी मेळघाटातील आदिवासींच्या प्रगतीसाठी झटणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर सुर्यवंशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.याप्रसंगी नागपूर जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार ,जीवन जजांळ ,गणेश पाटील व सचिन शेंदरे उपस्थित होते.आदिवासी हा एक साधासरळ सामाजिक समुह आहे.एकसमान भाषा बोलणारा ,एका निश्चित भुप्रदेशात वास्तव्य करणारा ,तांत्रिक ज्ञानाच्या दृष्टीने मागासलेला ,अक्षरओळख नसलेला व रक्तसंबंधावर आधारित सामाजिक व राजकिय पक्षांचे पालन करणारा एकजिनसी समुह आहे.त्यामुळे मेळघाटातील आदिवासींच्या जीवनावर आधारित "बोको"एक परंपरा "या नावाचा एक चित्रपट काढुन मेळघाटातील आदिवासींना जगाच्या नकाशावर आणण्यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचे सुधीर सुर्यवंशी यांनी सांगितले .सहनिर्माता जीवन जजांळ यांनी प्रास्ताविक तर गणेश पाटील यांनी संचालन व सचिन शेंदरे यांनी आभार मानले.
मेळघाटात "महिलांना काम व पुरुषांना आराम " आदिवासींच्या प्रगतीसाठी झटणार - सुधीर सुर्यवंशी
मेळघाटात "महिलांना काम व पुरुषांना आराम "
आदिवासींच्या प्रगतीसाठी झटणार - सुधीर सुर्यवंशी
आदिवासींच्या प्रगतीसाठी झटणार - सुधीर सुर्यवंशी