नागपूर, - विदर्भाच्या औद्योगिक, कृषी व अन्य क्षेत्रांचा विकास साधायचा असेल पायाभूत सुविधा बळकट करणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे जेणेकरून मोठ्या उद्योगांसाठी दळणवळण सुविधा उपलब्ध होऊ शकेल. विदर्भाची बलस्थाने ओळखून विकास करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार औद्योगिक महोत्सव -अॅडव्हान्टेज विदर्भ च्या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करीत होते. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तर्फे स्थानिक नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोड परिसरात आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, खा. डॉ. अनिल बोंडे, खा. अशोक नेते, संरक्षण विभागाचे सल्लागार ले. जनरल विनोद खंडारे, आ. आशिष जयस्वाल, व्ही एनआयटीचे डॉ. प्रमोद पडोळे, आयआयएचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, आ. मोहन मते, एडचे अध्यक्ष आशिष काळे व सचिव डॉ. विजय शर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.
रस्ते, वीज , पाणी आणि संपर्क सुविधा या औद्योगिक विकासासाठी महत्वाच्या असतात. विदर्भ हे या सर्व बाबतीत स्वयंपूर्ण होत असून समृद्धी महामार्गसारखे प्रक्पल विदर्भांत गुंतवणूक आकर्षित करतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भ हे मागासलेले क्षेत्र म्हणून चर्चा होते, पण विदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे द्रष्टे आणि विदर्भाविषयी आपुलकी असलेले नेते आहेत, व निसर्गाचे दान देखील भरपूर मिळाले आहे, त्यामुळे आगामी ५ वर्षात आत्मनिर्भर भारतात विकसित विदर्भ दिसेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र गीत आणि औपचारिक स्वागतानंतर स्वागत भाषण अध्यक्ष आशिष काळे यांनी केले व त्यातून महोत्सवातील आगामी तीन दिवसांच्या कार्यकलापांची माहिती दिली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी,सध्या नाागपूर व विदर्भासाठी सुवर्णकाळ आहे, यातून विदर्भ विकासासाठी नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते असल्याने हा हेतू साध्य होईल असे सांगितले.
अॅडव्हान्टेज विदर्भ महोत्सवाचा शुभारंभ - मा नितीनजी गडकरी
विदर्भाची बलस्थाने ओळखून विकास करणार - नितीन गडकरी
रस्त्यांसह अन्य पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर
नारायण राणे, देवंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
रस्त्यांसह अन्य पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर
नारायण राणे, देवंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती