नागपूर - वंचित बहुजन आघाडीला वापरण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
केंद्रातल्या मोदी सरकारविरोधात देशभरातले विरोधी पक्ष एकवटले आहेत. महाराष्ट्रातही भाजपाप्रणित एनडीएविरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. अशातच वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर गेल्या अनेक महिन्यांपासून या आघाडीसाठी प्रयत्न करत आहेत. मविआमधील शिवसेना (ठाकरे गट) या पक्षाबरोबर वंचितची आधीपासूनच युती आहे. आता केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून हिरवा कंदील येणं बाकी आहे. पंरतु, या दोन्ही पक्षांकडून अद्याप याबाबत कुठलीच कार्यवाही झाल्याचं दिसत नाही. त्यामुळे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे मविआवर संतापले आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मविआला इशारा दिला आहे.
वंचितच्या एका सभेत भाषण करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार जाऊन आता दोन वर्षे उलटली आहेत. अद्याप या तिन्ही पक्षांचं (काँग्रेस, शिवसेना उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस) जागावाटपावर एकमत झालेलं नाही. दोन वर्षांमध्ये यांना आपसांत अवघ्या ४८ जागा वाटून घेता आलेल्या नाहीत. त्यामुळे मला राहून राहून अशी शंका येतेय की, यांना खरंच नरेंद्र मोदी यांना हरवायचं आहे का? यांना आगामी निवडणुकीत भाजपाला पराभूत करायचं आहे का?
वंचितला वापरण्याचा प्रयत्न केलात तर मोदींबरोबर, - प्रकाश आंबेडकरांचा मविआला इशारा
अद्याप या तिन्ही पक्षांचं (काँग्रेस, शिवसेना उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस) जागावाटपावर एकमत झालेलं नाही. दोन वर्षांमध्ये यांना आपसांत अवघ्या ४८ जागा वाटून घेता आलेल्या नाहीत. त्यमुळे मला राहून राहून अशी शंका येतेय की, यांना खरंच नरेंद्र मोदी यांना हरवायचं आहे का