मुंबई - एकात्मिक लॉजिस्टिक्स पुरवठादार कंपनीने भिवंडी ह्या केंद्रीय पार्सल व माल उगम स्थानातील कार्यक्षेत्र विस्तारले आहे.
नवीन टर्मिनलमुळे कंपनीचे भिवंडीतील कामकाज वाढणार आहे स्वयंचलित केंद्र, वर्गीकरण, मालाची हाताळणी व ई-कॉमर्स रिटर्न्सची कामाचां समावेश आहे.
हा टर्मिनल 1,200,000 चौरस फुटांहून अधिक जागेत बांधण्यात आला आहे जागेतून दर 54 सेकंदाला एक ह्या दराने दिवसभरात 1600हून अधिक वाहने ये-जा करू शकतील अशा पद्धतीने टर्मिनलची आखणी करण्यात आली आहे.
गुरगाव, 20 डिसेंबर 2023: डेल्हीवरी लिमिटेड ह्या भारतातील मोठ्या पूर्णपणे एकात्मिक लॉजिस्टिक्स पुरवठादार कंपनीने भिवंडी मोठा मेगा-गेटवे यशस्वीरित्या कार्यान्वित केला आहे. 1,200,000 चौरस फुटांहून अधिक जागेत बांधलेला भिवंडी ट्रकिंग टर्मिनल भारतातील सर्वांत मोठ्या लॉजिस्टिक्स आस्थापनांपैकी एक आहे. ह्यामध्ये स्वयंचलित केंद्र, वर्गीकरण, रिटर्न्स व माल वाहतुकीचा समावेश आहे. डेल्हीवरीचा पार्सल अंशत: भरलेल्या ट्रक्समधील माल एकाच वेळी हाताळण्याची क्षमता ह्या टर्मिनलमध्ये आहे.
स्वयंचलित गेटवेमध्ये 196 डॉकिंग स्टेशन्स आहेत 8,000हून अधिक टन माल हाताळण्याच्या दृष्टीने त्रचना करण्यात आली आहे. दर 54 सेकंदाला एक ह्या दराने दिवसभरात 1600 वाहनांची ये-जा होऊ शकेल एवढी क्षमता ह्या टर्मिनलमध्ये आहे. ह्या आस्थापनेतील स्वयंचलन प्रणाली फाल्कन ऑटोटेकने (डेल्हीवरीची गुंतवणूक असलेली कंपनी) विकसित व कार्यान्वित केली आहे. ह्यामध्ये 1.8 किलोमीटर लांबीचे एकात्मिक डबल-केस क्रॉस-बेल्ट सॉर्टर्स (वर्गीकरणासाठी) आहेत साहित्याची वाहतूक करणाऱ्या 5 किलोमीटरहून अधिक लांबीच्या प्रणाली आहेत. दर तासाला 32,000हून अधिक शिपमेंट्स 17,000 मालाच्या युनिट्सवर प्रक्रिया करण्याची क्षमता ह्या प्रणालींमध्ये आहे.
डेल्हीवरीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल बारुआ म्हणाले विस्तारित भिवंडी गेटवेमुळे मुंबई संपूर्ण पश्चिम विभागातील मोठ्या व एसएमई माल वाहतूकदारांना सेवा देण्याची क्षमता वाढवणे शक्य होणार आहे. जागतिक दर्जाची खात्रीशीर व कार्यक्षम सेवाही देता येणार आहे. ह्या आस्थापनेतील अत्याधुनिक स्वयंचलन प्रणालीत केलेल्या गुंतवणुकीमुळे कार्यक्षमता व वेग ह्या दोन्हींमध्ये सुधारणा करणे शक्य होणार आहे नेटवर्कसाठी उद्योगक्षेत्रासाठी नवीन मापदंड स्थापन केला जाणार आहे.
भारतात सर्वांत मोठ्या ट्रकिंग टर्मिनल्सपैकी डेल्हीवरी स्थापन
डेल्हीवरी ही भारतातील सर्वांत मोठी पूर्णपणे एकात्मिक लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादार कंपनी आहे. कंपनीचे देशभर पसरलेले जाळे 18,600 हूनअधिक पिनकोड्सच्या भागात सेवा देते. एक्स्प्रेस पार्सल वाहतूक, पीटीएल फ्रेट, सीमापार वाहतूक, पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान सेवा ह्यांसारख्या विस्तृत लॉजिस्टिक्स सेवा कंपनी पुरवते. डेल्हीवरीने आपल्या स्थापनेपासून 2.5 अब्जांहून अधिक शिपमेंट्स यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत आणि आज कंपनीचे 30,000हून अधिक ग्राहक आहेत. ह्यात ई-कॉमर्समधील मोठे व छोटे घटक, एसएमई उद्योग व ब्रॅण्ड्सचा समावेश होतो. डेल्हीवरीबद्दल अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या- www.delhivery.com