ओला इलेक्ट्रिक ने डिसेंबर टू रिमेंबर मोहिमेची घोषणा
एस१ एक्स प्लस उच्च दर्जाची कामगिरी, प्रगत तंत्रज्ञान वैशिष्ट्ये माफक किमतीत उत्तम राइड गुणवत्ता देते. ही स्कुटर ३केडब्ल्यूएच बॅटरीसह येते १५१ किमीची प्रमाणित श्रेणी देते. ६ के डब्ल्यू मोटरचे पॉवर आहे एस१ एक्स प्लस ३.३ सेकंदात ०-४० के एमपीएच ला स्पर्श करते ९० केएमपीएच चा टॉप स्पीड आहे.
नागपूर - भारतातील ईव्ही कंपनी ओला इलेक्ट्रिकने एन्डआयसीइएज मिशनला गती देण्यासाठी डिसेंबर टू रिमेंबर मोहिमेची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत, सर्व नवीन एस१ एक्स प्लस २०,००० रुपये सवलतीसह उपलब्ध आहे, ज्यामुळे एस१ एक्स प्लसची किंमत केवळ ८९,९९९ आहे. यामुळे एस१ एक्स प्लस सर्वात स्वस्त टू व्हिल र ईवी स्कूटर ठरेल, बाजारात ही स्कुटर लोकप्रिय होईल.एस१ एक्स प्लस ची डिलिव्हरी देशभरात सुरु आहे ह्या स्कुटरला अभूतपूर्व मागणी आहे.एस१ एक्स प्लस उच्च दर्जाची कामगिरी, प्रगत तंत्रज्ञान वैशिष्ट्ये माफक किमतीत उत्तम राइड गुणवत्ता देते.स्कुटर ३केडब्ल्यूएच बॅटरीसह येते १५१ किमीची प्रमाणित श्रेणी देते. ६ के डब्ल्यू मोटरचे पॉवर आहे एस१ एक्स प्लस ३.३ सेकंदात ०-४० केएमपीएच ला स्पर्श करते ९० केएमपीएच चा टॉप स्पीड आहे.ओलाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अंशुल खंडेलवाल म्हणाले, ओला इलेक्ट्रिकने नोव्हेंबर महिन्यात ३०,००० युनिट्सच्या विक्रमी विक्रीसह एक नवीन उद्योग बेंचमार्क स्थापित केला आहे. नवीन एस१ एक्स प्लस ला मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी ईवी च्या मुख्य प्रवाहात , सर्वात मोठा अडथळा दूर करत आहोत. आघाडीच्या आयसीइ स्कूटरच्या समतुल्य किंमतीसह, खात्री आहे की एस१ एक्स प्लस एन्डआयसीइएज साठी तयार आहे.स्कुटरच्या विस्तृत श्रेणीसह आकर्षक किंमतीमुळे ग्राहकांना आयसीइ उत्पादन खरेदी करण्यास अडथळा नसेल, अशी खात्री आहे.फायनान्स ऑफरखरेदीदार निवडक क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड एमआयवर ५००० रुपयांपर्यन्त सवलत आहे तर फायनान्स ऑफर मध्ये शून्य डाउन पेमेंट, शून्य-प्रक्रिया शुल्क व ६.९९ टक्के इतके कमी व्याजदर इतर समावेश आहे