AROGYA

इंडियन चेस्ट सोसायटी ची वायु प्रदूषण वर सार्वजनिक चर्चा आयोजन - डॉ. सुंदीप साळवी

Nagpur Media News 03 Dec, 2023
इंडियन चेस्ट सोसायटी ची  वायु प्रदूषण वर सार्वजनिक चर्चा आयोजन -   डॉ. सुंदीप साळवी
इंडियन चेस्ट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुंदीप साळवी यांनी सांगितले वायू प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावापासून स्वतःचे संरक्षण करू शकता.
नागपूर - भारतातील केवळ 2% लोक स्वच्छ हवेचा श्वास घेत असतात वायू प्रदूषण गंभीर राष्ट्रीय समस्या आहे. भारतात वायू प्रदूषणाची पातळी धोकादायक आहे. दुसऱ्या क्रमांकाचे हरित शहर नागपूरमध्येही चिंताजनक बाब आहे . वातावरणात, वायू प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांपासून संरक्षण कसे करावे? या समस्येचे निराकरण करण्यासाठी इंडियन चेस्ट सोसायटीने वायु प्रदूषण आणि आरोग्य या विषयावर सार्वजनिक चर्चा आयोजित केली डॉ. सुंदीप साळवी , इंडियन चेस्ट सोसायटी, नॅशनल प्रेसिडेंट यांनी भाषण केले.पॅनेलच्या सदस्यांसोबत पॅनेल चर्चा झाली डॉ. सुंदीप साळवी यांच्यासह नीरीच्या प्रो. डॉ. राधा मुजे . संगीता गोयल घाटगे सहभागी झाले. नागपूरचे प्रख्यात पल्मोनोलॉजिस्ट डॉ राजेश स्वर्णकार सत्राचे संचालन केले वायुप्रदूषणामुळे श्वसनसंस्थेवर विशेषत: फुफ्फुसांवर विपरीत परिणाम होतो. यामुळे रुग्णांमध्ये अस्थमा सीओपीडीचा त्रास वाढण्याबरोबरच ब्राँकायटिस होऊ शकतो. डॉ. सुंदीप साळवी म्हणाले, बहुतेक ठिकाणी आपण श्वास घेत असलेली हवेची गुणवत्ता घातक आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.त्यासाठी काही कृती करणे आवश्यक आहे. जेव्हा बाहेर प्रदूषणाची पातळी खूप जास्त असेल किंवा घरच वायू प्रदूषणाचे स्रोत असेल तेव्हा घरामध्ये मास्क घाला. बाहेर जाताना नेहमी मास्क घाला. 3 लेयर्ड मास्क केवळ चांगले संरक्षण देत नाही तर धुण्यायोग्य पुन्हा वापरण्यायोग्य देखील आहे. घरी आल्यानंतर, नाक कोमट पाण्याने (जलनेती) धुण्याची सवय लावा
Previous Story Next Story