बसपात अंतर्गत कलहमुळे महाराष्ट्रात खिंडार
विवेक हाडके व प्रफुल मानके यांनी बसप ला राम राम ठोकून वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश
राष्ट्रीय पक्ष बसपा नेहमीच अंतर्गत कलह मध्ये गुरफटला असतो पक्ष बांधणीपेक्षा स्वहित कसे होणार यासाठी पदाधिकारी संघर्षं करतो जमीन स्तरावर चळवळ मध्ये कार्यकर्ता फुले शाहू आंबेडकर विचार धारा जनमानसात रुजवून जनजागरण करतो तर पदाधिकारी मात्र डॉ आंबेडकरांच्या नावावर निवडणूक साठी मांडवली करतात या अंतर्गत शीत युद्ध मुळे बसपा महाराष्ट्र मध्ये तग धरू शकली नाही 25 वर्षच्या कालखंडात 1 आमदार निवडून येऊ शकला नाही 10 नगरसेवक च्या वर बसप शहरात जम बसवू शकली नाही ही कॅडर बेस पक्षाची शोकांतिका आहे महाराष्ट त बसर्पप्रदेश अध्यक्ष nehmich वादाच्या भीवऱ्यात राहिले 12 वर्षे बसप प्रदेशअध्यक्ष ची धुरा सांभाळनारे गरुड साहेबांनी आंबेडकरी जनतेला भावनिक दिशाभूल केले प्रत्येक निवडणु क आली की कार्यकर्त्याला डावलून पुंजी वादी वर्गाला उमेदवारी देने ही प्रथा कायम ठेवली परिणांस्वरूप बसप प्रदेश अध्यक्ष ना जनतेने चांगले चोपले प्रत्येक प्रदेश अध्यक्ष ला आंबेडकरी जनतेने चोपले हे जगजाहीर आहे त्यामुळे वर्तमान स्थितीत बसपा तग धरू शकणार नाही हे तितकेच खरे आहे बसपाच्या अंतर्गत खदखदमुळे कॅडर बेस कार्यकर्ते पक्षात अनेक महत्वाची पदे भूषविनारे ज्यांनी तारुण्य पक्ष्यांसाठी पणाला लावले असे विवेक हाडके व प्रफुल मानके यांनी अचानक पक्षाला सिडचिटी देऊन वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला बसप हा महाराष्ट्रमध्ये कोणत्याच प्रादेशिक पक्षासोबत युती करायला तयार नाही स्वबळावर एक ही उमेदवार निवडून येण्याची ताकद नाही ऐनवेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मध्ये माघार तसेच विधान परिषद निवडणूक मध्ये बसप चा उमेदवार नाही नागपूर पदवीधर निवडणुकीत 2 उमेदवाराना पांठिंबा पत्रदेने हा विचित्र प्रकार बसप प्रदेशअध्यक्ष संदीप ताजने यांनी केला असल्याचा आरोप पत्रपरिषदेमध्ये केला आहे या बाबत दाद मागण्या साठी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी याची भेट घेतली असता त्यांनी उडवाउडवि ची उत्तरे दिली प्रदेशअध्यक्ष संदीप ताजने याना पदमुक्त करण्याची मागणी होती पण ती पक्षश्रेष्टी नि फेटाळुन लावली त्यामुळे बसप ला रामराम ठोकण्याचा निर्णय घेऊन समविचारी पक्ष वंचित बहुजन आघाडी मध्ये रीतसर प्रवेश केला अशी प्रतिक्रिया पत्र परिषद मध्ये विवेक हाडके व प्रफुल मानके यांनी व्यक्त केली या पत्रपरीशदे ला वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष रवी शेंडे राहुल वानखेडे बुरबुरे व इतर पदा धिकारी उपस्थित होते