स्वाधारगृहातील महिला व बालकांना दिवाळी भेट - भागवत प्रवचनकार अंजलीताई अनासाने
द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूर तर्फे दिवाळी साजरी करण्यात आली स्वाधारगृह महिला व बालकल्याणआधारगृहाला भेट देऊन महिलांना साड्या, फराळाचे, बालकांना ड्रेस, बिस्किट केक कापून आनंद साजरा केला.
नागपूर :- श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूर तर्फे दिवाळी साजरी करण्यात आली स्वाधारगृह महिला व बालकल्याण आधारगृहाला(नागपूर) भेट देऊन महिलांना साड्या, फराळाचे, बालकांना ड्रेस, बिस्किट केक कापून आनंद साजरा केला. निराधार महिला मुले सोबत सवांद साधला . भागवत प्रवचनकार अंजलीताई अनासाने यांनी उपस्थित जनसमुदायसमोर सांत्वना देऊन सकारात्मक जगण्याचा संदेश त्या दिला.