MANORANJAN

१ मे २०२४ रोजी होणार चित्रपट प्रदर्शित छोटेखानी टीझर प्रदर्शित

Nagpur Media News 19 Oct, 2023
१ मे २०२४ रोजी होणार चित्रपट प्रदर्शित  छोटेखानी टीझर प्रदर्शित
हरीश्चंद्राची फॅक्टरी आत्मपॅम्प्लेट वाळवी यां गाजलेल्या चित्रपटांचे कर्ते घेवून येत आहेत धमाल मराठी चित्रपट नाच गं घुमा स्वप्नील जोशी पहिल्यांदाच निर्मात्याच्या भूमिकेत
मधुगंधा कुलकर्णी व परेश मोकाशी लिखित नाच गं घुमा चे दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे.
१ मे २०२४ रोजी होणार चित्रपट प्रदर्शित छोटेखानी टीझर प्रदर्शित
नागपूर - स्त्री हा निसर्गाचा मास्टरपीस आहे बायकांना जग चालवायला दिले तर युद्ध होणार नाही, फक्त एकमेकांशी न बोलणारे देश असतील अशा अनेक टिप्पण्या बायकांबद्दल केल्या जातात विशेषणे लावली जातात. नेमक्या याच स्वभाववैशिष्ट्यांवर आधारित, गमती-जमतींवर आधारित, एका अगदी धमाल चित्रपटाची निर्मिती करत आहेत मराठीतील आघाडीचे कलाकार. स्वप्नील जोशीची पहिलीच चित्रपट निर्मिती असलेला नाच गं घुमा नावाचा हा चित्रपट लिहिला आहे मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी ह्यांनी आणि दिग्दर्शक आहेत परेश मोकाशी. नाच गं घुमा ही ज्येष्ठ लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेली कथा असून महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या संबंधित अनेक छोट्या मोठ्या गोष्टी यात गुंफल्या गेल्या आहे. महिलांच्या संबधातील गोष्टी साकारताना स्त्रीत्त्वाचा एक वेगळा पैलू अलगद समोर येतो तिच्या बुद्धी भावनेच्या अचूक मिश्रणावर प्रकाश पडतो. चित्रपटाची आज घोषणा केली गेली त्या निमित्ताने एक छोटेखानी टीझर प्रदर्शित केला गेला. चित्रपट १ मे २०२४ रोजी प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. कुलकर्णी यांनी ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी ही संकल्पना ऐकवली नी त्यांना ती आवडली. मोकाशी यांनी सहलेखक म्हणून या संकल्पनेला एक वेगळी उंची दिली. त्यानंतर मग निर्मितीसंबंधी चर्चा झाली तेव्हा, सर्वांनी त्यांचे सर्वकाही पणाला लावायचे ठरवले. परेश मोकाशी, मधुगंधा त्याची फिल्म त्याच्या पैशांनी करणार होतेच पण शर्मिष्ठा राऊत त्यांचे पती तेजस देसाई तसेच स्वप्नील जोशी यांनीही ती जबाबदारी घ्यायची ठरवले. चित्रपटाच्या घोषणेच्या निमित्ताने फेसबुकवर लिहिले आहे, घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर जगातील सर्व सर्व स्त्रियांना त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत नव्या चित्रपटाची घोषणा नाच गं घुमा भेटूया चित्रपटगृहात १ मे २०२४ ला सहज म्हणून शर्मिष्ठा, तेजस आणि स्वप्नील यांना या चित्रपटाच्या वाचनासाठी बोलावले. ते हसून हसून हैराण झाले . स्वप्नीलने विचारले मी काय करू गोष्ट बायकांची आहे तर मी साडी नेसून रोल करतो.’परेश म्हणाला, नाही. तू काहीच करायचे नाही. तुला यात रोल नाही.त्यावर स्वप्नील म्हणाला, मग मी निर्मात्याचा रोल करतो.परेश मधुगंधा घाबरले. स्वतःच्या पैशांचा जुगार खेळणे वेगळे पण मित्राच्या पैशाशी मस्ती करू शकत नाही. पण तो मागे हटला नाही. म्हणाला, हे स्क्रिप्ट स्त्रियांचे आहे त्यामागे उभा राहिलो तर ती जगातील सर्व बेटर हाफ प्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असेल स्वप्नीलची व्यवसायातील पार्टनर तृप्तीने लगेच आर्थिक भाग उचलायचे कबुल करून त्यात उडी मारली. नव्याने मालिकांच्या निर्मितीतCV उतरलेले शर्मिष्ठा तेजस मागे हटणार नव्हते. सहज वाचनासाठी जमलेला हा संच, तितक्याच सहजपणे आणि झटक्यात निर्मात्यांचा समूह बनला,कुलकर्णी म्हणाल्या
Previous Story Next Story