नागपूर - आरोग्य सेवा क्षेत्रातील वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरने वर्ल्ड हार्ट डे साजरा करण्यात आला सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी महिनाभर चालणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले होते. उपक्रमांचा एक भाग म्हणून वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरने त्यांच्या परिसरात 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत हार्ट अवेअरनेस वॉकथॉन आणि झुंबा सत्राचे आयोजन केले आशा वेणुगोपाल, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरी , फ्लॅग ऑफ सत्राच्या सन्माननीय अतिथी
उपस्थित होत्या. कार्यक्रम वॉकथॉनसाठी 150 झुंबा व सत्रासाठी 100 हून अधिक जण सहभागी होते. रविवार असल्याने अनेक जण कार्यक्रमात संख्येने सहभागी झाले. सहभागींनी उत्साहाने वॉकथॉनमध्ये भाग घेतला वोक्हार्ट हॉस्पिटल नागपूरच्या उपक्रमाचे कौतुक केले.
रोटरीच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आशा वेणुगोपाल म्हणाल्या सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याबाबत एवढी जागरुकता उपक्रम इतक्या मेहनतीने राबवणारे हॉस्पिटल मी पहिल्यांदाच पाहिले आहे
डॉ. नितीन तिवारी हृदयरोगतज्ज्ञ ,जे वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरमध्ये १९ वर्षांपासून कार्यरत आहेत, म्हणाले स्वतःचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमांचे पालन केले पाहिजे नियमितपणे व्यायाम करणे, निरोगी हृदयासाठी आहाराचे पालन करणे हृदयाला निरोगी ठेवण्या साठी असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश असलेली जीवनशैली अंगीकारणे
वर्ल्ड हार्ट डे दिनानिमित्त वोक्हार्ट हॉस्पिटल्सचा उपक्रम, वॉकथॉन झुंबा सत्र आयोजन सम्पन्न
29 सप्टेंबर हा दिवस जागतिक ह्रदय दिवस म्हणून साजरा केला जातो नागपूर शहरातील व्होकार्ट हॉस्पिटल ने ओचित्य साधुन एक महिना विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार केला असून वॉकथान झुंबा व ह्रदय जागरुकता उवक्रम सातत्याने महिनाभर सुरू राहणार आहे - डॉ नितीन तिवारी -व्होकार्ट हॉस्पिटल