नागपूर - भारतीय संस्कृतीत दान ला महत्त्व आहे. रक्तदान, नेत्रदान याविषयी समाजात जनजागृती झाली आहे. शासनाच्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमांपैकी अवयवदान" हा राष्ट्रीय उपक्रम आहे आजपावेतो वैज्ञानिकांनी विविध क्षेत्रात भरपूर संशोधन करून नवनवीन शोध लावले आहेत काही शोध लावण्याच्या प्रयत्नात आहेत.
सन १९५४ साली पहिल्यांदा अवयवदान करण्यात आले. त्यावेळी रोनाल्ड ली हेरिकने किडनी दान करून भावाला नवजीवन दिले. त्याचवेळी डॉ.जोसेफ मरे यांनी पहिल्यांदा किडनी प्रत्यारोपण केले. मानवतावादी कार्यासाठी डॉ. जोसेफ मरे ना 1990 साली शरीरशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
दि.१३ ऑगस्ट रोजी अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी, त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी, लोकांमधील भिती दूर होण्यासाठी जागतिक अवयवदान दिवस जगभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. दिवस लोकांना मृत्यूनंतर त्यांचे निरोगी अवयव गरजू व्यक्तीला दान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे, फुफ्फुसे, त्वचा इत्यादी अवयव दान केल्याने दीर्घ आजारांनी ग्रस्त लोकांचे प्राण वाचविले जावू शकतात.
निरोगी अवयवांच्या अनुपलब्धतेमुळे लोक प्राण गमावतात. अवयवानामुळे त्यांचे प्राण वाचवू शकतो. व्यक्ती वयाच्या १८ वर्षांपासून ते ६४ वर्षापर्यंत अवयवदान करता येवू शकते.
पृथ्वीवर कोणतीही वस्तू वाया जात नाही. रुग्णाबाबत अवयवावरील औषधोपचार संपल्यावर डॉक्टरांचा शेवटचा सल्ला असतो तो म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणजेच अवयव प्रत्यारोपण. शरीराचा निकामी झालेला अवयव उदा. किडनी, यकृत, डोळे, ह्रदय,
त्वचा इ.शस्रक्रियेव्दारे प्रत्यारोपण करून त्याजागी दान केलेला संबंधित अवयवाचे वैद्यकीय सल्ल्यानुसार मानवी शरीरात प्रत्यारोपण केले जाते. मानवाचे प्राण वाचविण्यासाठी मानवी अवयवदान महत्त्वाचे आहे
गरजू व्यक्तीची निकामी अवयवाची गरज पूर्ण होण्यासाठी जनजागृती करून जीवनदान दिले जाते. समाजात अवयवदानाविषयी मार्गदर्शन तसेच जनजागृती होणे आवश्यक आहे. घरातील व्यक्तीला अपघात, शस्त्रक्रिया इ.वेळेस जेव्हा तातडीची गरज तेव्हा खऱ्या अर्थाने याची जाणीव होते. प्रत्येकाला रुग्णाचा जीव वाचवायचा असतो. यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. पण नाईलाज असतो कारण पैसा, औषध, इ. बाबी आपण धावपळ करून उपलब्ध करु शकतो. मनुष्याचा अवयव आणणे घरातील नातेवाईकांना अवयवदान करण्यासाठी प्रवृत्त करणे, हे कठीण काम आहे. कारण पैसा, औषध अशा गोष्टीसाठी मदत कुणीही करेल, पण अवयवाची मदत कुणीही करु शकणार नाही. याला कारण देखील आहे, समाजात जनजागृती होणे, गैरसमज दूर होणे, अत्यावश्यक, ही काळाची गरज आहे. शासन स्वयंसेवी संस्था आदींच्या माध्यमातून मानवाच्या अवययदानाचे महत्त्व,मार्गदर्शन ,फायदे, कार्यपद्धती आदि विषयांबाबत समुपदेशन व जनजागृती होणे आवश्यक आहे.
अवयवदानाचे महत्त्व:-
शरीरातील कोणताही अवयव निरुपयोगी होणे, म्हणजे त्या संपूर्ण कुटुंबाचे शारीरिक, आर्थिक, मानसिक स्वास्थ्य नष्ट होणे. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होऊन जाते. शरीरातील अवयव निरुपयोगी होण्यामुळे मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुप्फसे अशा अनेक भागांवर परिणाम होऊ शकतो. वेगवेगळ्या आजारांमुळे देशात दरवर्षी साधारणतः लोक बळी पडतात. यातील अनेकांचा मृत्यू हा शरीरातील एखादा महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे होतो. अवयदानामुळे अनेकांचा जीव वाचविला जाऊ शकतो.
नातेवाईकांची संमती आवश्यक
देशात दररोज अपघातात अनेक लोकांचा मृत्यू होतो . अपघात झाल्यानंतर संबंधितास दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर कधीकधी त्या रुग्णास ब्रेनडेड घोषित केले जाते. अशा वेळेस डॉक्टर तसेच तज्ञांकडून त्या रुग्णाच्या घरातील व्यक्तीला, नातेवाईकांना समजावून, दुसऱ्याला जीवनदान मिळण्यासाठी अवयवदानाबाबत समुपदेशन केल्यास आवश्यक अवयवदान करता येऊ शकते. गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते . अशा वेळी स्वैच्छिक अवयवदानाने लोकांना जीवनदान मिळू शकते. शासन तसेच शासनमान्यता विभागामार्फत काढलेल्या अवयवांचे ६ ते ७२ तासात पुन:र्रोपण करण्यात येते.
एक अवयवदाता आठ लोकांचे जीव वाचवू शकतो. जिवंत असताना यकृत,मूत्रपिंड, फुफ्फुस,स्वादुपिंड, ह्रदय,त्वचा आणि आतडे इ.अवयवांचे दान करता येते. जे शरीर मरणानंतर नष्टच होणार आहे, मग अवयवदानाने एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळत असेल तर आपण स्वतःहून अवयवदानाची समाजात जनजागृती करण्यात गैर काय ही जनजागृती सामान्य जनतेपर्यंत जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत अवयवदान हे दानदेखील माणुसकीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे, हे समाजाला पटवून दिले पाहिजे. प्रत्येक मानवाने सामाजिक बांधिलकी म्हणून अवयवदानासाठी पुढे येऊन जवळच्या शासनमान्यताप्राप्त अवयवदान केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे. मरणोत्तर निरोगी नेत्र, यकृत,किडनी, शरीराचे विभिन्न भाग इ.स्वयंस्फूर्तीने दान करु शकता.अवयवदान हे आजच्या युगात गरजू रुग्णांसाठी नक्कीच आशेचा किरण ठरणार आहे, शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. शरीरातील अवयव वेळप्रसंगी गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकेल अवयवदानाचा उपदेश करणे, अवयवदान संमतीपत्र भरून देणे सोपे आहे. परंतु जेव्हा अवयवदान करण्याची प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा मात्र अवयवदानाविषयी केलेला निश्चय गळून पडतो ज्या कुटुंबातील व्यक्ती ब्रेन डेड असते किंवा ती व्यक्ती मरण पावते तेव्हा साहजिकच सर्व कुटुंबिय दुःखात बुडालेले असतात,अशा दु:खद प्रसंगी कुटुंबियांचे समुपदेशन करणे, हे अवघड काम डॉक्टर समुपदेशक यांना करावे लागते.
मृत्यूनंतरही अवयवदान करू या - हेमकांत सोनार
अवयवदानाचे महत्त्व:-
शरीरातील कोणताही अवयव निरुपयोगी होणे, म्हणजे त्या संपूर्ण कुटुंबाचे शारीरिक, आर्थिक, मानसिक स्वास्थ्य नष्ट होणे. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होऊन जाते. शरीरातील अवयव निरुपयोगी होण्यामुळे मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुप्फसे अशा अनेक भागांवर परिणाम होऊ शकतो.
हेमकांत सोनार,
अलिबाग-रायगड.व
9511882578
शरीरातील कोणताही अवयव निरुपयोगी होणे, म्हणजे त्या संपूर्ण कुटुंबाचे शारीरिक, आर्थिक, मानसिक स्वास्थ्य नष्ट होणे. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होऊन जाते. शरीरातील अवयव निरुपयोगी होण्यामुळे मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुप्फसे अशा अनेक भागांवर परिणाम होऊ शकतो.
हेमकांत सोनार,
अलिबाग-रायगड.व
9511882578