SMAMAJIK

डॉ. प्रिती तोटावार यांची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षपदी निवड

Nagpur Media News 03 Dec, 2020
डॉ. प्रिती तोटावार यांची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षपदी निवड
. प्रिती तोटावार यांची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षपदी निवड
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी डॉ. प्रिती तोटावार यांची निवड, पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि जागृतीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन डॉ. प्रिती तोटावार यांची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. प्रिती तोटावार ह्या सध्या नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अमरावती विभाग महिला अध्यक्षा म्हणून उत्कृष्टरीत्या कार्य करीत आहेत. मागील काही वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणविषयक कार्यात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे याकरिता त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यापैकी विदर्भभूषण पुरस्कार , कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार, समाज वैभव पुरस्कार, समाजप्रबोधन साहित्य पुरस्कार व नुकतेच शिक्षणरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. प्रिती तोटावार यांचे पर्यावरणविषयक विविध संशोधनपर लेख प्रकाशित असून मार्गदर्शन शिबिरे व व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा मौलिक संदेश समाजाला दिला आहे.शेतकऱ्यांना पक्षीसंवर्धनाचे महत्व कळावे याकरिता पर्यावरण आणि शेतकरीमित्र ही माहीती पुस्तिका प्रकाशित झाली आहे. डॉ. प्रिती तोटावार यांच्या मार्गदर्शनात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेतील पदाधिकारी व सदस्यांद्वारे उत्कृष्ट उपक्रम राबविले जात असून त्याद्वारे समाजात पर्यावरणविषयक जनजागृती निर्माण होण्यास मदत होत आहे. पर्यावरण क्षेत्रामध्ये केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, राष्ट्रीय सल्लागार हरिविजय देशमुख तथा वरिष्ठ कार्यकारणीतील अधिकृत समिती मार्फत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. दिपक भवर, उपाध्यक्ष महेश जाधव, सचिव सचिन वाघ तसेच संस्थेतील समस्त कार्यकारीनीद्वारे व समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.(
Previous Story Next Story