नागपूर - वोक्हार्ट हॉस्पिटल्स काळजी नवोपक्रमाची परंपरा असलेल्या आरोग्य सेवा प्रदाता वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर ने अवयवदाना बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी उडान 2023 या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले आहे.
उडान – 2023 हा वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरचा कार्यक्रम आहे, जागतिक अवयवदान दिनानिमित्त अवयव दान जनजागृतीसाठी अवयवदाते प्राप्तकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर तर्फे गेल्या काही वर्षांतील कार्यक्रमाची ही दुसरी आवृत्ती आहे.उडान 2023 ही थीम गिफ्ट ऑफ लाईफवर आधारित आहे. गिफ्ट ऑफ लाईफ ही थीम म्हणजे एक उदात्त कृती जी जीव वाचवते नवीन जीवन देते. ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीकडून अवयवदान म्हणजे एक प्रकारे अवयवदान मिळालेल्या व्यक्तीसाठी गिफ्ट ऑफ लाईफच आहे.कार्यक्रमात, प्रख्यात डॉक्टर - प्रोफेसर . डॉ. टॉम चेरियन, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन , डॉ. संजय कोलते डॉ. सूर्यश्री पांडे, नेफ्रोलॉजी किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन आणि डॉ. देवयानी ठाकरे वक्ते म्हणून असतील. वोक्हार्ट हॉस्पिटलने आजपर्यंत अनेक अवयव प्रत्यारोपण केले आहेत
अवयवदाते प्राप्तकर्ते/त्यांचे नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित राहून अनुभव शेअर करतील. वोक्हार्ट हॉस्पिटल्सने नागपूर शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चित्रकला, नृत्य, स्किट, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, फ्लॅशमॉब नाविन्यपूर्ण माध्यमांद्वारे त जनजागृतीच्या कल्पना सादर
केले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्सचा कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अवयवदानाबद्दल प्रबोधन करण्याचा, अवयवदानाचे महत्त्व समजून घेण्याचाया उदात्त कार्यात योगदान देण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.प्रोफेसर डॉ. टॉम चेरियन हे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एलएडी कॉलेजमध्ये अवयव दानाबद्दल जनजागृती सत्र संबोधित करणार आहेत.प्रख्यात लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन प्रो. डॉ. टॉम चेरियन म्हणाले, अवयव दानाबद्दल अधिक जागरूकता निर्माण केली पाहिजे अनेक जीव वाचवता
येईल अशा प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी व्यवस्थापित करता येईल. अवयवदान, एक असे कार्य ज्याने अनेक कुटुंबांना आनंद दिला आहे जो शब्दात सांगता येणार नाही डॉ. संजय कोलते आरोग्याचे खरे मूल्य समजून घ्या, तुम्ही निघून गेल्यावर शरीररूपी संपत्तीचे अंत्यसंस्कार करू नका. जिवंतपणी अवयव दान करण्याची प्रतिज्ञा घ्या गरजूंना मदत करा, भरभराट करा. अवयवदान करून कोणाच्यातरी मृत्यूमध्ये तुमचा श्वास टाका
डॉ. सूर्यश्री पांडे, नेफ्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन म्हणाल्या त्या नेहमीच अवयवदान करण्याच्या खंबीर समर्थक आहेत जेव्हा एखाद्याचा जीव वाचतो, तेव्हा ते पाहणे अनुभवणे हा एक उत्तम क्षण असतो.डॉ. देवयानी ठाकरे म्हणाल्या, व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट आहे पेंटिंग करायला आवडते. अवयवदानाचा संदेश देण्यासाठी या कलेची निवड केली ती मुख्य कला लोकांशी सहजतेने जोडल्या जाते लोक त्यात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची जागृती निर्माण करण्यासाठी कला हे परिपूर्ण माध्यम आहे एक कलाकार म्हणून या प्रसंगी उपस्थित राहण्यात आनंद आहे
वोक्हार्ट हॉस्पिटल्सला वर्ल्ड ऑर्गन डोनेशन दिन अवयवदानाविषयी जनजागृती
कार्यक्रमात, प्रख्यात डॉक्टर - प्रोफेसर . डॉ. टॉम चेरियन, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन , डॉ. संजय कोलते (व्हीपी - झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर ), डॉ. सूर्यश्री पांडे, नेफ्रोलॉजी किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन आणि डॉ. देवयानी ठाकरे वक्ते म्हणून असतील. वोक्हार्ट हॉस्पिटलने आजपर्यंत अनेक अवयव प्रत्यारोपण केले आहेत