नागपूर- ६७ वर्षीय रुग्णाचा शुद्ध रक्तवाहिनीचा व्हॉल्व निकामी झाला तहृदयासंबंधी गुंतागूंत निर्माण झाली व्हॉल्व। बदलविण्याची ओपन हार्ट सर्जरी पर्याय होता. नागपुरातही अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्याने ‘ट्रान्सकॅथेटर अॅवओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट’(TAVI) हा चिरफाड केल्याशिवाय व्हॉल्व बदलविण्याचा पर्याय होता. वोक्हार्ट हॉस्पिटल ला रुग्णावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनमोल सोनावणे यांनी प्रक्रिया केली. त हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन तिवारी, डॉ. अमेय बीडकर, कार्डियोव्हॅस्कुलर सर्जन डॉ. सुमीत पाठक, भूलतज्ज्ञडॉ. पंकज यांच्या चमूने सहकार्य केले. रुग्णास उच्चरक्तदाब, मुत्रपिंडाचा त्रास अशा कोमॉर्बिडिटीज् असल्याने ओपन हार्ट सर्जरीमध्ये जोखिम होती ‘ट्रान्सकॅथेटर अॅबओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट’ हाच एकमेव पर्याय असतो. जर ॲकोर्टिक वॉल्व निकामी झाली असेल, तर रुग्णाचे जीवनमान कर्करोग रुग्णांपेक्षाही कमी असू शकते व अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. रुग्णाने देखील वेळ न दडवता वॉल्व बदलविण्याची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.रुग्णाची परिस्थिती चांगली असून रक्तपुरवठा सुरळीत आहे.
ट्रान्सकॅथेटर अॅनओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट मध्ये अॅबन्जियोग्राफी व अॅरन्जियोप्लास्टी प्रमाणे हातातून नळी रक्तवाहिनीद्वारे ह्रदयापर्यंत नेण्यात येतो. पेसमेकरद्वारे हृदयाची स्पंदने २५० बीट प्रति मिनिट पर्यंत वाढविण्यात येतात. हृदय स्थिर झाले की, कृत्रिम कॅथेटरद्वारे नेण्यात आलेल्या वॉल्वला हृदयात उघडण्यात येतो. कालांतराने तो स्थिर झाला की, कॅथेटर काढून घेतल्या जातो. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णास सुंगणी देण्याची गरज नसते. रुग्ण शुद्धीवर असताना प्रक्रिया होऊ शकते. चिरा देण्याची गरज नसल्याने रक्तस्त्राव होण्याचा धोका नसतो. रुग्णाला तीन-चार दिवसात इस्पितळातून सुटी मिळते. रुग्णांना ओपन हार्ट सर्जरी जोखिमीची आहे, त्यांसाठी ही उपचारपद्धती प्रभावी आहे. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये सर्व स्पेशालिटीचे डॉक्टर अत्यंत सुविधेने युक्त अतिदक्षता विभाग असल्यानेच ही प्रक्रिया येथे होऊ शकते. अशा प्रक्रिया नागपुरात शक्य असल्याने रुग्णाला बाहेर जावे लागत नाही. . त्यामुळे नागपूर मेडिकल हब म्हणून नावाजल्या जात आहे. जोखिम असणार्यांसाठी वरदानच
टावी प्रक्रिया आहे ज्यांना ओपन हार्ट सर्जरीची जोखिम आहे, त्यांच्यासाठी वरदानच आहे. हृदयशास्त्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता चिरफाड न करताही वॉल्व रिप्लेसमेंट शक्य झाले आहे.
टावी प्रक्रियेने बदलविला हृदयाचा वॉल्व; शस्त्रक्रियेशिवाय उपचार
वोक्हार्ट हॉस्पिटलच्या हृदयरोगतज्ज्ञांचे सुयश
रुग्णाची गुंतागूंत टाळण्यात यश
नागपुरातही अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्याने ‘ट्रान्सकॅथेटर अॅवओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट’(TAVI) हा चिरफाड केल्याशिवाय व्हॉल्व बदलविण्याचा पर्याय होता. वोक्हार्ट हॉस्पिटल ला रुग्णावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनमोल सोनावणे यांनी प्रक्रिया केली.
रुग्णाची गुंतागूंत टाळण्यात यश
नागपुरातही अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्याने ‘ट्रान्सकॅथेटर अॅवओर्टिक वॉल्व रिप्लेसमेंट’(TAVI) हा चिरफाड केल्याशिवाय व्हॉल्व बदलविण्याचा पर्याय होता. वोक्हार्ट हॉस्पिटल ला रुग्णावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनमोल सोनावणे यांनी प्रक्रिया केली.