RAJKIYA

शेवटी डॉ आशिष देशमुख भाजप च्या गळाला

Nagpur Media News 18 Jun, 2023
शेवटी डॉ आशिष देशमुख भाजप च्या गळाला
डॉ आशीष देशमुख याचा पुर्नप्रवेश सोहळा अंत्यत थाटात पार पडला पक्षावर श्रद्धा आणि स्वतःवर सबुरी चे अभिवचन देत हाच अंतिम प्रवेश असावा असे भाकीत त्यांनी केले या भाजप च्या व्यासपीठावरून त्यांनी काँग्रेस वर खरमरीत टीका केली तोंडसुख घेतले शरसंधान साधले राहुल गांधी हे ओबीसी चे विद्रोही आहेत या मुद्यावर पक्षातून निष्कसित केले गांधी कुटुंब नेहमीच ओबीसी साठी विद्रोही ठरले आहे काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले कार्यकर्ता चे म्हणणे ऐकून घेता येत नाही सवांद साधत नाही
विदर्भातील नानागिरी संपणार आहे ज्या काँग्रेस पक्षाने रणजित देशमुखांना पालकमंत्री प्रदेश अध्यक्षपद व भरपूर आशीर्वाद अनेक स्वरूपात मिळाले ज्या काँग्रेस ने मोठे केले त्याच काँग्रेस ला आज त्याचाच मुलगा काँग्रेस म्हातारी झाली असे संबोधितात हे विशेष
नागपूर - काँग्रेस पक्षातून निष्कसित झालेले माजी आमदार डॉ आशिष देशमुख याचा भाजप मध्ये पुर्नरप्रवेश केला शेवटी भाजप ला नागपूर जिल्ह्यातील एका तडफदार युवा नेत्याला गळाला लावण्यात यशप्राप्ती झाली कोराडी रोड स्थित नवैद्यम नार्थ इस्ट ला उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्र शेखर बावनकुळे आमदार प्रवीण दटके जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये मा राजीव पोतदार याच्या प्रमुख उपस्थिती त प्रवेश सोहळा पार पडला
या प्रसंगी डॉ आशिष देशमुख यांनी पक्ष सोडला पण त्यानी काँग्रेस वर तोंडसुख घेण्याची संधी सोडली नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याच्यावर शरसंधान साधले ओबीसी च्या मुद्याला घेउन काँगेस ने 6 वर्षासाठी निष्कसित केले आणि अशातच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे संपर्क संधी शोधत होते आणि त्यांनी संधीचे सोने केले भाजप च्या व्यासपीठा वरून काँग्रेस वर खरमरीत टीका करत कांग्रेस आता म्हातारी झाली आहे असे वक्तव्य करीत सुबह का भुला रात को घर लोट आया तो ऊसे भुला नही कहते अस ते स्वतःच म्हणत भाजप वरती स्तुती सुमन उधळली भाजप जी काही माझ्यावर जबाबदारी सोपविणार ती हिरहिरीने पार पाडणार मी काही लोकसभा विधानसभा निवडणूक लढणार नाही हे जाहीर आवाहन या माध्यमातून आहे मी निवडणुकीसाठी प्रवेश घेतला नाही तर एक उदात्त हेतू ठेयुन विदर्भातील 11 जिल्ह्यातील ओबीसी बांधवाना संघटीत करणार यासाठी लवकरच एक मोठा महामेळावा चे आयोजन होणार आहे ओबीसी ना न्याय मिळयुन देणारअसल्याची ग्वाही देत आहे फडणवीस यांच्या कार्यशैली चे कोतुक करत त्यांनी समृद्धी मार्गांची गाथा वाचली शेतकरीहीत कर्जमाफी रोजगार या बाबत प्रशंसा केली जे विरोधी पक्षात विरोधी पक्षात होते त्यांना च त्यांनी भाजप च्या पंक्तीत आणून बसविले बावनकुळे साहेब जनसामान्यांचा नेता आहे पायात भिंगरी घालून महाराष्ट्र पिंजून काढत आहे असा प्रतिभावान उर्जावान नेता महाराष्ट्राला बावनकुळे च्या रुपात लाभला आहे विदर्भातील नानागिरी काटोल ची काकागिरी सावनेर ची दादागिरी संपविल्याशिवाय राहणार नाही माझ्या झालेल्या चुकांचे प्राईचीत म्हणून मी विदर्भात घरोघरी भाजप चा झेंडा रोवणार आमदारकी माझ्यासाठी खूप काही नाही नाना पटोले ना आमदार की माझ्या वडिलांनी बहाल केली फडणवीस 2019 मध्ये मुख्यमंत्री असणे गरजेचे होते अशा वेळी उद्धव ठाकरे नि खंजीर खुपसला नाही तर तलवार टाकली म्हणजेच विदर्भ द्रोह केला त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्याची जागा त्यांना दाखविली पाहिजे असे ही ते म्हणाले

फडणवीस म्हणाले, डॉ. देशमुखांना स्वगृही आणण्याचं महत्वाचं कारण म्हणजे, ते मोठे कलाकार आहेत, ते सामान्य माणूस नाही. २००९साली सावनेरमध्ये त्यांनी निवडणूक लढली. भाजपने त्यावेळी प्रयत्नांची शर्थ केली. पण देशमुखांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केदारांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं.
आज खरोखर आनंदाचा दिवस आहे. डॉ. आशिष देशमुख यांच्यासारखा तरुण, तडफदार आणि राजकारणाची समज असलेला नेता स्वगृही परत आला, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. देशमुखांचे भाजपमध्ये स्वागत केले.
या प्रवेश सोहळा मध्ये माजी आमदार डॉ मिलिंद माने सुधीर पारवे सुधाकर कोहळे अशोक धोटे अशोक मानकर रमेश मानकर माजी आमदार रेड्डी चरणसिंग ठाकूर राजू पोतदार आसोले के रेवतकर आनंदराव राउत अजय बोढारे उपस्थित होते
Previous Story Next Story