RAJKIYA

देशात बीआर एस च्या पक्षविस्तार साठी विदर्भातून बिगुल -चंद्रशेखर राव - मुख्यमंत्री तेलंगाणा

Nagpur Media News 16 Jun, 2023
देशात बीआर एस च्या पक्षविस्तार साठी विदर्भातून बिगुल -चंद्रशेखर राव - मुख्यमंत्री तेलंगाणा
इतर घटक पक्षा प्रमाणे बी आर एस काही कोणत्याही पक्षाची बी टीम नाही जनतेचा विकास व शेतकरी समृद्ध हाच प्रमुख अजेंडा घेउन पक्ष विस्तार प्रत्येक राज्यात करीत आहोत कुणाला लाभ कुणाला तोटा हा विषय बी आर एस चा नाहीं पण येणाऱ्या काळात बी आर एस ला फायदा होणार हे निश्चित आहे मताचे विकेंद्रीकरण हा पक्षाचा विषय नाही पक्षविस्तात हा आमचा प्रमुख सत्ता मार्ग आहे
नागपूर- तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव याचे महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या गृह शहरात आगमन झाले वर्धा रोड स्थित साई मंदिर जवळ पक्ष कार्यालयाचे उदघाटन पार पडले विदर्भातील 11 जिल्हा चे हे हक्काचे पक्ष कार्यालय आहे या कार्यालयात 24 तास कार्यकर्त्याना जेवण मिळणार आहे तद्नंतर सुरेश भट सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता तिथे कार्यकर्त्यांना संबोधित केलें इतर अनेक पक्षाचे नेते गळाला लागल्याचे चित्र दिसले बी आर एस ची पक्षविस्तार कडे वाटचाल असून विदर्भातून बिगुल वाजविला आहे विदर्भातील 11 जिल्ह्यासाठी हक्काचे पक्ष कार्यालय स्थापित केले
एका नामांकित हॉटेल मध्ये पत्रकारांशी सवांद साधला
वर्तमान भारत विद्यमान सरकारच्या काळात भारत एका नाजूक दिशेने वाटचाल करत आहे देशाची अर्थव्यवस्था बिकट आहे गेली 75 वर्षात वीज व पाणी समस्या कायमची सुटली नाही देशात पाणी मुबलक प्रमाणात आहे पण साठवणूक यंत्रणा सफशेल अयशस्वी ठरली आहे देशात कोळसा खाणी आहेत त्यामुळे वीज निर्मिती साठी अडचण नाही पण कोळसा चा पुरेपूर उपयोग वीज निर्मिती साठी होत नाही आहे वीज आणि पाणी समस्या निवारण साठी बी आर एस कडे ठोस उपाययोजना आहेत संशोधन अहवाल आहे पण त्यासाठी बी आर एस ची देशात सत्ता असणे आवश्यक आहे त्
ध्येय उराशी बाळगून देशातील प्रत्येक राज्यात पक्षविस्तार करत आहोत
भारत हा कृषिप्रधान देश आहे पण शेतकरी सुखी समृद्ध नाही शेतकरी आत्महत्या वाढीस लागल्या आहेत विदर्भात तर हे प्रमाण अधिक आहे विद्यमान सरकारचे कृषीविषयक धोरण हे फोल ठरले आहे सरकारचे कसलेही नियंत्रण नाही आहे देशातील बुद्धिजीवी वर्गांना हाताशी धरून एक नवीन क्रांती बी आर एस घडवून आणण्याचे संकेत आहे केंद्र सरकारचे असे कोणतेच धोरण नाही की देशात बदल येणार विद्यमान सरकार च्या कालखंडात देशाची वाटचाल ही अधोगती कडे जात आहे यातुन प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी बी आर एस एक सशक्त पर्याय आहे सिंगापूर सारख्या देशात पाणी नाही पण प्रत्येक वस्तू आयात होतें कारण बुद्धिजीवी वर्गाचा भरणा अधिक आहे वर्तमान स्थितीत तर प्रत्येक क्षेत्रांत भारतीय रँक ची घसरण होत आहे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी तेलंगाणा मॉडेल अंगिकारावे व महाराष्ट चा सर्वांगीण विकास घडवून आणावा तर माझी वाटचाल मध्यप्रदेश कडे राहणार तेलंगाणा तील शेतकरी सर्वगुणसंपन्न व समृद्ध झाला आहे राज्यभर शेतकऱ्यांसाठी कृषी विकास साठी विशेष मोहीम राबविली आहे 14 राज्यातील नागरिक तेलंगाणा मध्ये रोजगार करत आहे शेतीविकसाची कार्ये करीत आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची शेतात विक्री होते शासकीय यंत्रणा ही शेतकऱ्याच्या दारी जाउन शेतमाल खरेदी करण्याची अभिनव योजना तेलंगाणा सरकारने आखली आहे तेलंग
गांना मध्ये तलाठी पद रद्द केले आहे सर्व ऑनलाइन झाले आहे शेतकरीसाठी मोफत वीज उपलब्ध आहे शेतकऱ्यांना 5 लाख विमा कवच आहे या उपायययोजना मुळे शेतकरी आत्महत्या शून्यावर आल्या आहे म्हणून तेलंगाणा शेतकरी सुख समृद्ध आहे हे मॉडेल देशातील इतर राज्यांनी राबवून अब की बार किसान की सरकार असा नारा देत देशात पक्ष विस्तारासाठी बी आर एस ने पाऊल उचलले आहे
महाराष्टत लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका स्वबळावर पूर्ण ताकदीनिशी लढणार कोणत्याही घटक पक्षसोबत जाणार नाही देशाला सशक्त पर्याय फक्त बी आर एस आहे
धर्म जातीच्या नावावर देशात फूट पाडून निवडणुका लढविल्या जिंकल्या जात आहे पण या निवडणुका त्या नेत्याच्या पक्षच्या आहेत जनतेला लाभ नाही
Previous Story Next Story