RAJKIYA

मनपा 2022 च्या निवडणुकीत काँग्रेस ची सरशी होणार -प्रमोद सोरते

Nagpur Media News 18 Mar, 2021
मनपा 2022 च्या निवडणुकीत काँग्रेस ची सरशी होणार -प्रमोद सोरते

नाना भाऊ पटोले महाराष्ट्र काँग्रेस कमिटी च्या प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने महाराष्ट राज्यात येणाऱ्या काळात सत्ता परिवर्तन होणार असून प्रत्येक कार्यकर्त्यां मध्ये नवीन ऊर्जा व संचार निर्माण झाला आहे

नागपूर - दक्षिण नागपूरमधील काँग्रेस चे युवा लोकप्रिय नेते प्रमोद सोरते याच्याशी थेट सवांद साधला आजच्या घडीला महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ची प्रदेशअध्यक्ष पदाची धुरा नाना पटोले यांनी सांभाळली तेव्हापासून काँग्रेस कार्यकर्ता मध्ये एक नवे उत्साहाचे वातावरण असून नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे एक नवीन चित्र निर्माण झाले असून सर्व नेते हेवे दावे विसरून संघटित होत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मा नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना भाऊ नि काट्याची टक्कर दिली काँग्रेस च्या वाटचाली मध्ये वाढ होत असून असंख्य कार्यकर्तेचा पक्ष प्रवेश होत आहे पक्ष संघटन व उभारणी साठी प्रत्येक कार्यकर्ता कामाला जुंपला आहे नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदार संघात काँग्रेस ने ऐतिहासिक विजय संपादन केला असून अभिजित वंजारी याचे पाठीशी काँग्रेसपक्षनेते गटा तटाचे राजकारण बाजूला सारून एकदिलाने प्रचार आणि प्रसार केला त्यामुळे अजिंक्य गढाला खिंडार पाडले भ बदल नांना भाऊ याच्या संघटन मुळे झाला आजच्या स्थितीत नानाभाऊ सारख्या नेत्याची काँग्रेस उभारणीसाठी गरज होती ती खऱ्या अर्थाने साजेशी ठरत आहे 2022 च्या मनपा निवडणूक मध्ये काँग्रेस ची सरशी होणार हे निश्चित आहे काँग्रेस चा महापौर विराजमान होणार हे कागदावरील रेषेप्रमाणे सत्य आहे शहरातील गटातटा चे राजकारणाला पूर्णविराम मिळाला आहे
कोरोना कार्य काळा मध्ये केंद्र सरकार सर्व सामान्य नागरिकांवर खर्चाचा बोजा वाढवीत आहे पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढी मुळे कंबरडे मोडले आहे कोरोनामुळे रोजगार नाही हाताला काम नाही आणि सरकारची टांगती तलवार यामुळे त्रस्त झालेली जनता केंद्र सरकारला जागा दाखविणार आहे पण काँग्रेस पक्ष मात्र या बाबत आंदोलन मध्ये मागे पडला आहे त्यामुळे केंद्र सरकारला कुणाचा धाक उरला नाही उलट मनमानी सुरू आहे
मनपा निवडणुकीसाठी पक्षश्रेष्टी जो निर्णय घेतील तो मान्य असणार जो कोणी उमेदवार असणार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तनमन धना ने सहकार्य करणार व काँग्रेस ची प्रतिमा उंचावणा युवकाची फळी आज दक्षिण नागपुरात असून संघटन मजबुत करण्यासाठी नेहमी युवा मेळावे शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन होत असते मागील 30 वर्षांपासून मी दक्षिण नागपूर मध्ये संघटन मजबूत करीत आहे
मा नितीन राऊत यांनी घोषित केलेल्या टाळेबंदी चा निर्णय योग्य आहे कोरोना सक्रमन वाढीस लागल्यामुळे कठोर टाळेबंदी चा निर्णय घेण्यात आला आहे पण कामगार वर्ग स्थानांतरित मजूर साठी काही ठोस उपाययोजना करणे अगत्याचे आहे कोरोना कार्यकाळातटाळेबंदी मध्ये मी स्वतः गरीब गरजवंतांना अन्न धान्य किट वितरण केले स्थानांतरित मजुरांची 2 वेळेच्या भोजन ची व्यवस्था चामठ चोक मध्ये काँग्रेस नेता गिरीश पांडव यांच्या मदतीने केली
कोरोना पासून बचाव करण्यासाठी नागरिकांना आवाहन आहे की गर्दी करू नका गर्दीच्या ठिकाणी जाने टाळा तोंडाला नेहमी मास्क लावा सॅनिटीझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुवा प्रशासनाला मदत करा स्वताचो काळजी घ्या ही या माध्यमातून आपणास विनंती आहे
Previous Story Next Story