नागपूर
,: : भारतातील दूरसंचार सेवा प्रदाता कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने आज घोषणा केली की, मागील 12 महिन्यांत महाराष्ट्र आणि गोव्यात 3,400 हून अधिक नवीन 5G साइट्स उभारण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना वेगवान इंटरनेट, व्यापक कव्हरेज सुधारित नेटवर्क अनुभव मिळत आहे.
महाराष्ट्र आणि गोव्यात डेटा वापराची मागणी वेगाने वाढत आहे, उद्दिष्ट या मागणीपेक्षा पुढे राहण्यासाठी सतत नेटवर्क अधिक मजबूत करणे आहे. 3,400 हून अधिक नवीन 5G साइट्स जोडल्यामुळे 2.2 कोटीहून अधिक ग्राहकांना अधिक वेगवान स्पीड, व्यापक कव्हरेज अधिक विश्वासार्ह अनुभव देत आहोत. विशेषतः विकासशील जिल्ह्यांमध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक, कनेक्टिव्हिटीतील कमतरता दूर करून भविष्याभिमुख नेटवर्कच्या माध्यमातून प्रदेशाच्या डिजिटल विकासाला बळकटी देण्याच्या एअरटेलच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. असे रबी शंकर मिश्रा, सीईओ, महाराष्ट्र व गोवा, भारती एअरटेल यांनी सांगितले.महाराष्ट्र गोव्यातील ग्राहकांना अखंड डिजिटल उपलब्धता प्रदान करण्यासाठी एअरटेल ₹399 रिचार्ज पॅकमध्ये स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी पूर्णपणे अनलिमिटेड डेटा प्लॅन उपलब्ध करून देत आहे.
महाराष्ट्र गोव्यात 3,400 हून 5G साइट्ससह एअरटेलद्वारा नेटवर्कचा विस्तार
महाराष्ट्र आणि गोव्यात डेटा वापराची मागणी वेगाने वाढत आहे, उद्दिष्ट या मागणीपेक्षा पुढे राहण्यासाठी सतत नेटवर्क अधिक मजबूत करणे आहे. 3,400 हून अधिक नवीन 5G साइट्स जोडल्यामुळे 2.2 कोटीहून अधिक ग्राहकांना अधिक वेगवान स्पीड, व्यापक कव्हरेज अधिक विश्वासार्ह अनुभव देत आहोत.