UDYOJAGTA

ऑल इंडिया प्लास्टिक मान्युफॅक्चर्स असोसिएशन ची 24 सप्टेंबर 25 ला मुंबई मध्ये परिषद

Nagpur Media News 18 Sep, 2025
ऑल इंडिया प्लास्टिक मान्युफॅक्चर्स असोसिएशन ची 24 सप्टेंबर 25 ला मुंबई मध्ये परिषद

ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIPMA) तर्फे इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन बूस्ट इंडियाज एक्सपोर्ट ऑफ प्लॅस्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट
अ ग्लोबल सोर्सिंग हब २४ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई येथे,
भारताचे ध्येय – जागतिक पातळीवर प्लास्टिक क्षेत्रात आघाडीचे नेतृत्व, ४ पट निर्यात वाढविण्याचे उद्दिष्ट

,मुंबई:
२०२४ मध्ये १,३०० अब्ज डॉलर्सच्या जागतिक प्लास्टिक बाजारपेठेत भारताचा हिस्सा केवळ १२.५ अब्ज डॉलर्स,पुढील तीन वर्षांत निर्यात चौपट वाढवण्याचे लक्ष्य,५०,००० हून अधिक MSMEs, ४.६ दशलक्ष रोजगार व १२५ देशांना निर्यात – भारताची ताकद जागतिक प्लास्टिक व्यापारात भारत निर्णायक उडी घेण्यासाठी सज्ज आहे. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या ध्येयदृष्टीखाली, ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIPMA) ने पुढील तीन वर्षांत भारतातील प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्सच्या निर्यातीला चौपट वाढवण्याची महत्वाकांक्षी रणनीती जाहीर केली आहे. तसेच २४ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेची घोषणाही करण्यात आली.AIPMA च्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्री. अरविंद मेहता म्हणाले, हा फक्त व्यापार विस्तार नसून, भारताला जागतिक प्लास्टिक हब बनवण्याचा राष्ट्रीय मिशन आहे. मेहता यांनी सांगितले की, जागतिक प्लास्टिक फिनिश्ड वस्तूंचा व्यापार सुमारे १,३०० अब्ज डॉलर्स इतका आहे, परंतु भारताचा हिस्सा केवळ १२.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच एकूण ०.९६% इतका आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेत एकट्याने ७२.३५ अब्ज डॉलर्स किमतीची प्लास्टिक उत्पादने आयात केली जातात, परंतु त्यात भारताचा वाटा फक्त १.२% आहे. योग्य धोरणांमुळे २-३ नवीन पॉलिमर प्लांट्स, प्लास्टिक मशिनरी व सहयोगी युनिट्समध्ये १००% वाढ,! MSME-आधारित उत्पादनात मोठी भर पडू शकते. रोजगार व कौशल्यविकासात भर पडेल. चीनच्या Canton Fair च्या उदाहरणावरून योग्य शासकीय धोरणे निर्यात कशी बदलू शकतात हे स्पष्ट होते.भारतातील प्लास्टिक उद्योग प्रामुख्याने MSME-आधारित आहे. देशभरात ५०,००० हून अधिक युनिट्स कार्यरत असून या क्षेत्रात सुमारे ४.६ दशलक्ष लोक थेट व अप्रत्यक्षरित्या रोजगार करतात. निर्यात लक्ष्य साध्य झाले तर रोजगार संधी ६ दशलक्षांवर पोहोचू शकतात.AIPMA चे अध्यक्ष श्री. मनोज आर. शाह यांनी म्हटले, ही फक्त व्यापाराची गोष्ट नाही; तर लाखो MSMEs ना सक्षम करणे, देशभरात रोजगार निर्माण करणे आणि भारताला प्लास्टिक फिनिश्ड प्रॉडक्ट्सचे जागतिक केंद्र बनवणे हे आमचे ध्येय आहे
Previous Story Next Story