नागपूर, - जागतिक अवयवदान दिन दरवर्षी 13 ऑगस्ट ला अवयवदानाच्या जनजागृती व अवयवदानाशी संबंधित असलेल्या गैरसमजांची जाणीव करून देण्यासाठी जगभरात साजरा केला जातो. काळजी नवोपक्रमाची परंपरा असलेले अग्रगण्य आरोग्य सेवा प्रदाता, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर विविध कल्पनांद्वारे विशेष जनजागृती मोहीम राबवते., जागतिक अवयवदान दिनानिमित्त, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरने लिवर, किडनी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी सेकंड ओपिनियन क्लिनिक सुरू केले आहे. सेकंड ओपिनियन क्लिनिकमध्ये रुग्णांना तज्ञांचा सल्ला, स्क्रीनिंग पॅकेजमध्ये सवलत, अवयवदानासाठी काउंसलिंग नोंदणी आर्थिक सहाय्य मार्गदर्शन मिळेल. सेकंड ओपिनियन क्लिनिकच्या शुभारंभप्रसंगी रवी बी. सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर, डॉ. पीयूष मारूडवार, लिवर डिसीज एक्सपर्ट, डॉ. सूर्यश्री पांडे, किडनी ट्रांसप्लांट एक्सपर्ट, डॉ.गुंजन लोणे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट एक्सपर्ट उपस्थित होते. यावेळी वोक्हार्ट हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी यावेळी काही महत्त्वाची विचार मांडले.
डॉ पीयूष मारूडवार, लिवर डिसीज एक्सपर्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर म्हणाले, अवयवदान ही जीवनाची देणगी आहे. अवयवदान म्हणजे इतरांचे जीवन वाचवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी स्वतःचे अवयव किंवा ऊती देण्याचे निःस्वार्थ कृती आहे. हे एक महान कार्य आहे जे प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तींना आशा, आराम आणि दुसरी संधी देऊ शकते. अवयवदानामुळे 8 लोकांचे प्राण वाचू शकतात. वाढत्या अवयवदानमुळे जीवनरक्षक प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा वेळ कमी होतो. जिवंत दान व मृत दान असे दोन प्रकार आहेत. जिवंत दान म्हणजे किडनी, लिव्हर लोब्स यांसारखे अवयव जिवंत असताना दान करणे आणि मृत दान म्हणजे मृत्यूनंतर, विशेषत: मेंदूच्या मृत्यूनंतर किंवा हृदयविकाराच्या मृत्यूनंतर अवयव दान करणे.
जागतिक अवयवदान दिन दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी, जनजागृती
हा दिवस एक महत्त्वाचा स्मरणपत्र म्हणून काम करतो की एखादी व्यक्ती अवयव दाता बनण्याचे निवडून काय फरक करू शकते. किडनीचा आजार देशभरात लाखो लोकांना प्रभावित करतो, अनेक रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असताना तात्पुरता उपाय म्हणून डायलिसिसवर अवलंबून असतात